एसपी कार्यालयासमोरच आढळला कुजलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:46 AM2019-03-13T00:46:11+5:302019-03-13T00:46:26+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील संरक्षक भिंतीला चिटकूनच एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

Missing bodies found in front of SP office | एसपी कार्यालयासमोरच आढळला कुजलेला मृतदेह

एसपी कार्यालयासमोरच आढळला कुजलेला मृतदेह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अधीक्षक कार्यालयासमोरच मृतदेह आढळला आणि तोही कुजलेल्या अवस्थेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
पंडीत तुकाराम घोरपडे (५५ रा.कुक्कडगाव, ता.बीड) असे त्या इसमाचे नाव आहे. घोरपडे हे बीडमध्येच फिरत असतात. कधी तरी ते घरी जात असल्याचे सांगण्यात आले. कामधंदा न करता बीडमध्ये फिरत असल्याने नातेवाईकही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असत. त्यामुळे ते किती दिवसांपासून गायब होते, हे त्यांनाही सांगता आले नाही. मंगळवारी सकाळी ऐन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी धाव घेत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. बीड शहर ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हद्दीवरून पोलिसांत गोंधळ उडाल्याने सर्वच आवाक झाले.

Web Title: Missing bodies found in front of SP office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.