शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

भीक्षेकऱ्याचे गायब झालेले पावणेदोन लाख रुपये मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

याबाबतची माहिती अशी की, येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे (वय ८०, रा. रामनगर तांडा) ...

याबाबतची माहिती अशी की, येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे (वय ८०, रा. रामनगर तांडा) हे भाविकांकडून भीक्षा मागत असतात. त्यांना दोन मुले, सुना, एक मुलगी असा परिवार आहे. मुले वीटभट्टीवर कामास आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांनी शहर पोलीस ठाणे येथे येऊन आपली पैशाची पिशवी गायब असल्याची तक्रार रडत केली होती. पोलिसांनी नाईकवाडे यांना सोबत नेऊन, ते कुठे बसत होते, कुठे झोपत होते, कुठे राहत होते, याची पाहणी केली. वैद्यनाथ मंदिराजवळील रामनगर तांडा येथे छोट्याशा खोलीत ते राहतात. त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, काही किलोमीटर अंतरावर एक पिशवी आढळून आली. त्यातील पैसे मोजले असता, एक लाख ७२ हजार रुपये असल्याचे आढळून आले. त्यामध्ये दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास व दहा रुपयांच्या नोटा होत्या. ही सर्व रक्कम नाईकवाडे यांना सहायक पोलीस निरीक्षक पालवे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आली.

परळी शहरचे सहायक पोलीस निरीक्षक जे. बी. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुट्टे, गोविंद भताने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

बाबूराव नाईकवाडे हे गेल्या काही वर्षांपासून वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवतात. अंगात रग असेपर्यंत त्यांनी काही वर्षे मजुरीचे काम केले. जसजसे वय वाढत गेले, तसे काम जमत नसल्याने त्यांनी मंदिर परिसरातच भीक्षा मागण्यास सुरू केले. अनेक वर्षांपासून जमा केलेले पैसे ते पिशवीत ठेवत आणि ती पिशवी स्वतःजवळच ठेवून झोपत होते. सोमवारी रात्री झोपल्यानंतर पैशाची पिशवी हरवल्याने ते मंगळवारी पहाटे अस्वस्थ झाले व रडतच सकाळी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांची पैशाची पिशवी कशी गायब झाली, याचे कोडे मात्र कायम आहे.

===Photopath===

250521\img-20210525-wa0288_14.jpg