अंबाजोगाईजवळ कार अपघातात युवक ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:18 IST2017-12-25T11:33:47+5:302017-12-25T12:18:13+5:30
अंबाजोगाई - लातूर रोडवरील साखर कारखाना नजीक असलेल्या हॉटेलसमोर रविवारी रात्री झालेल्या इनोव्हा कारच्या भीषण अपघातात शाम बिडगर या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.

अंबाजोगाईजवळ कार अपघातात युवक ठार, तीन जखमी
अंबाजोगाई (बीड ) : अंबाजोगाई - लातूर रोडवरील साखर कारखाना नजीक असलेल्या हॉटेलसमोर रविवारी रात्री झालेल्या इनोव्हा कारच्या भीषण अपघातात शाम बिडगर या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. जखमींमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांचा समावेश असून जखमींवर अंबाजोगाई, लातुरात उपचार सुरु आहेत.
पालकमंत्री पंकजा मुंडे चुलत भाऊ रामेश्वर मुंडे हे रविवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या इनोव्ह गाडीने (एमएच १२ एव्ही १२१२ ) लातूरहून परळीकडे येत होते. गाडी अंबा साखर कारखाना येथून पुढे आल्यानंतर हॉटेल समोरील वळणावर एका झाडावर आदळली. या भीषण अपघातात शाम बिडगर या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर रामेश्वर मुंडे यांच्यासह अन्य तीन जण गभीर जखमी झाले.
जखमींमधील दोघांना उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले असून एकावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.