लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:09 IST2019-03-08T00:08:30+5:302019-03-08T00:09:17+5:30

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून गत सहा महिन्यांपासून सतत अत्याचार केल्यावरून एका तरुणावर आणि त्याच्या दोन मित्रांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Minor girl tortured by showing bait for marriage | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अंबाजोगाई : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून गत सहा महिन्यांपासून सतत अत्याचार केल्यावरून एका तरुणावर आणि त्याच्या दोन मित्रांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील चोपनवाडी येथील मुलगी दिंडीत गेली असताना घाटनांदूर येथील नागेश उत्तम आपटे या तरुणासोबत तिची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून नागेशने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार दुचाकीवरून आणि कारमधून चोपनवाडी शिवार, उजनी शिवार, घाटनांदूर शिवार आणि स्वत:च्या शेतात, परळी-नंदागौळ रस्त्यालगत नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केला आणि त्यानंतर लग्नाला नकार दिला. याकामी नागेशला त्याच्या सोमेश्वर आणि गणेश (दोघेही रा. घाटनांदूर) या दोन मित्रांनी सहकार्य केले, असेही पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात नागेश आपटे, सोमेश्वर आणि गणेश या तिघांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून नागेशला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक केंद्रे हे करत आहेत.

Web Title: Minor girl tortured by showing bait for marriage