Minor girl tortured by abducting | अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देलग्नाचे आमिष : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील घटना

बीड : लग्नाचे आमिष दाखवित अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे घडली. या प्रकरणी गावातीलच एका तरूणावर अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मोबीन दिलावर सय्यद (२१, रा. अंबिकानगर, तलवाडा) असे आरोपीचे नाव आहे. मोबीन व पीडिता हे तलवाड्यातच राहतात. दोघांचेही शेजारीच घर असल्याने त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनीही डिसेंबर २०१८ मध्ये गावातून धुम ठोकली. यावेळी नातेवाईकांनी त्यांना शोधून आणले.
त्यानंतर दोघांनाही आपआपल्या नातेवाईकांच्या स्वाधीन करून हे प्रकरण गावातच मिटले. मुलीच्या वडिलांनी तिला नंतर ठाणे येथे आपल्या मेहुण्याकडे ठेवले. २१ मे ला ती तेथून गायब झाली. नातेवाईकांकडून शोध घेण्यात आला मात्र, ती सापडली नाही.
दोन दिवसांपूर्वी ती तलवाडा येथे असल्याची माहिती मिळताच तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पीडितेच्या वडिलाच्या फिर्यादीवरून अपहरण, अत्याचार व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी मोबीन सय्यद यास बुधवारी अटक केली असल्याचे तपास अधिकारी तथा उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी सांगितले.


Web Title: Minor girl tortured by abducting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.