बीड येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची लातुरमधून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:22 IST2019-01-14T15:22:43+5:302019-01-14T15:22:58+5:30
पोलिसांनी अपहरण करणाऱ्या दोघांना लातूरमधून अटक करून मुलीची सुटका केली.

बीड येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची लातुरमधून सुटका
बीड : ढेकणमोहा येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला लातूरला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत अपहरण करणाऱ्या दोघांना लातूरमधून अटक करून मुलीची सुटका केली.
तालुक्यातील ढेकणमोहा येथील १५ वर्षीय विद्यार्थिनीला दोघांनी अपहरण करुन नेले होते. याप्रकरणी संकेत राजेंद्र ढेरे व अन्य अल्पवयीन आरोपी विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दरम्यान त्यांना आरोपी हे लातूरमध्ये असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी लातूर येथे जाऊन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना अटक करून मुलीची सुटका केली. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर आरोपींना बीड येथील पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.