मंत्र्यांना फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:21 AM2018-12-01T00:21:12+5:302018-12-01T00:21:45+5:30

धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा असलेला आरक्षणाचा प्रश्न मागील चार वर्षांपासून रखडलेला असून शासन केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

Ministers will not be allowed to rotate | मंत्र्यांना फिरू देणार नाही

मंत्र्यांना फिरू देणार नाही

Next
ठळक मुद्देधनगर आरक्षण : माजलगावात महाएल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा असलेला आरक्षणाचा प्रश्न मागील चार वर्षांपासून रखडलेला असून शासन केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास मंत्र्यांना  गावबंदी करणार असल्याचा इशारा राज्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला.
येथील मोंढा मैदानावर आयोजित महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उत्तमराव जानकर, शिवाजी राउत, कल्याण आबुज, डॉ. भगवान सरवदे, प्रकाश गवते, माधव निर्मळ, बंडु खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, आरक्षण हा धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा प्रश्न केवळ धनगड व धनगर या एका शब्दामुळे प्रलंबित आहे. शिफारस पाठवून आरक्षण मिळत नसून शासनाने परिपत्रक काढण्याची गरज आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे याकरीता राज्यभर वणवा पेटला आहे. चार वर्षे झाले तरी आरक्षणावर हे सरकार काहीच बोलत नाही. दोन महिन्यात एसटीचे प्रमाणपत्र न दिल्यास मंत्र्यांना राज्यभर गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रा. प्रकाश गवते, कल्याण आबुज, माधव निर्मळ, बंडु खांडेकर, प्रा. चामनर यांनी भाषणे केली. जिल्ह्यातून समाज बांधव बहुसंख्येने मेळाव्यास उपस्थित होते.
आरक्षणप्रश्नी सरकार निरुत्तर - उत्तम जानकर
यावेळी बोलतांना उत्तम जानकर म्हणाले, निवडणूकीपूर्वी आरक्षण घेतल्याशिवाय या सरकारला सोडणार नाहीत.
आरक्षणप्रश्नी सरकार निरूत्तर आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास राज्यभर आंदोलन उभा करणार आहे.
मराठवाड्यातून धनगर समाजाचे दोन खासदार होणार आहेत. समाज बांधवांनी एकत्रित येऊन आरक्षणप्रश्नी लढा उभरण्याची गरज असल्याचेही उत्तम जानकर यांनी सांगितले.

Web Title: Ministers will not be allowed to rotate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.