धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

By मुकेश चव्हाण | Published: January 26, 2021 02:47 PM2021-01-26T14:47:28+5:302021-01-26T15:01:38+5:30

धनंजय मुंडे यांच्यासमोर नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या.

Minister Dhananjay Munde slapped the officers on the street in beed | धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

Next

बीड: ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी  ध्वजारोहण केले. तसेच शासकीय मानवंदना स्वीकारली. यावेळी उपस्थितांना धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी स्मार्ट ग्राम पंचायत पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायती, विशेष सेवा पुरस्कार प्राप्त पोलीस, तसेच राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या सर्व कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे हे बीडच्या विश्रामगृहात थांबले होते. नेहमीप्रमाणे धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

धनंजय मुंडे यांच्यासमोर नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासनही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारी ऐकून धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच जाब विचारत फैलावर घेतलं. त्याचप्रमाणे कामात हयगय नको, अशी तंबीही धनंजय मुडे यांनी अधिकाऱ्यांना दिली. धनंजय मुंडेंच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं. 

धनंजय मुंडेंवरील बलात्काराचा आरोप मागे-

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.  गेल्या काही वेळापासून तिची बहिण (करुणा शर्मा) आणि मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. 

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणातात...

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.

Web Title: Minister Dhananjay Munde slapped the officers on the street in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.