मन सुन्न करणारी घटना ! आईच्या मानेवर विळयाने वार करून मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 16:38 IST2021-09-01T16:37:59+5:302021-09-01T16:38:53+5:30
माय लेकरात घरगुती कारणावरून कुरबुरी होत असत.

मन सुन्न करणारी घटना ! आईच्या मानेवर विळयाने वार करून मुलाची आत्महत्या
माजलगाव ( बीड ) : घरगुती वादातून मुलाने आईच्या मानेवर विळयाने वार केला. यानंतर घाबरलेल्या मुलाने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मालीपारगाव येथे घडली. जखमी आईची तब्येत गंभीर असून त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे.
मालीपारगाव येथील पारूबाई मच्छिंद्र कदम वय (50) व यांचा मुलगा बापू मच्छिंद्र कदम वय (30) वर्षे यांच्या घरगुती कारणावरून कुरबुरी होत असत. दरम्यान, आज दुपारी दीड वाजता मायलेकरात भांडणाची सुरुवात झाली. यावेळी चिडलेल्या मुलाने विळा घेऊन आईच्या मानेवर वार केला. घाव वर्मी लागल्याने आई गंभीर जखमी झाली. त्यांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी रवाना केले. दरम्यान, या घटनेने मुलगा बापू प्रचंड घाबरला. त्याच अवस्थेत तो मालीपारगाव शिवारात पोहचला. येथील एका शेतातील झाडाला गळफास घेऊन बापूने आत्महत्या केली.
हेही वाचा - डॉक्टर असलेल्या भाजप नगराध्यक्षाचे महिला रुग्णाशी अश्लील चाळे, गुन्हा दाखल