शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मध्यरात्री काळाची झडप; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 11:06 AM

Accident In Beed : मृतात एक विद्यार्थी व सलून व्यावसायिकाचा समावेश तर जखमीत प्रशिक्षणार्थी पोलीस

केज ( बीड ) : शहराच्या मध्य भागातील कानडी रस्त्यालगत मध्यरात्री १:०० च्या दरम्यान झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक जागीच ठार तर एक प्रशिक्षणार्थी पोलीस जवान जखमी झाला आहे. सुजित राऊत आणि सुमित सिरसाट अशी मृतांची नावे आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १:०० वा. च्या दरम्यान सुजित सुरेश राऊत वय २० वर्ष, रा. सुमित संदीपान सिरसट वय १८ वर्षे दोघे रा फुले नगर केज व गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण घेत असलेले विजयकुमार पांडुरग घोळवे रा. समता नगर केज हे मोटार सायकलवर (एमएच-४४/एम-२३०३) घराकडे जात होते. शहराच्या मध्य भागातून जात असलेल्या केज-बीड महामार्गावर कानडी रोडवरील कांचन मेडिकल समोर एका अज्ञात वाहनाने मागील बाजूने धडक दिली. यात सुजित राऊत व सुमित सिरसट  जागीच ठार झाले. अपघाता नंतर मोटार सायकल सुमारे १०० ते १५० फूट फरफटत नेली. तर विजयकुमार पांडुरग घोळवे यांच्या उजव्या पायाला व डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा गंभीर होता की, रस्त्यावर रक्त मासाचा सडा पडला होता.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रमेश सानप, बाळासाहेब अहंकारे व चालक हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह व जखमी व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

अपघातात मृत्यू पावलेला सुमित संदिपान सिरसट हा या वर्षी इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाला होता व दि. २१ रोजी त्याने अंबाजोगाई येथे MH-CET परीक्षा देऊन आला होता. सुजित सुरेश राऊत याचे एक वर्षा पूर्वी लग्न झाले असून तो केश कर्तनालयात काम करीत आहे. जखमी विजयकुमार पांडुरंग घोळवे वय ३५ या संरक्षण सेवेतून सेवा निवृत्त झाला असून त्या नंतर तो गडचिरोली येथर पोलीस सेवेत भरती झालेला असून तो वैद्यकीय रजेवर गावाकडे केज येथे आलेला आहे.

अपघात कसा घडला असावा ? या अपघाता बाबत अनेक तर्क वितर्क वर्तविण्यात येत आहेत. सुजित राऊत व सुमित राऊत हे घराकडे येत असताना रस्त्यात त्यांना विजयकुमार घोळवे हा पायी येत असावा. म्हणून त्यांना गाडीवर बसवून तिघे घराकडे जात असावेत.  त्यांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली असावी किंवा सुजित राऊत व सुमित सिरसट हे दोघे बस स्टँड कडून घराकडे जात असताना रस्त्यात पायी चालत जाणारा विजयकुमार घोळवे हा त्यांना धडकला असावा. यात ते मोटार सायकलवरून खाली पडले. त्याच वेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली असावी असावी. असा अंदाज आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात