लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तीन वर्षानंतर प्रथमच ३० सप्टेंबर २०१८ रोजी बीडमध्ये मुक्कामी येणार आहेत. १ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता बीड जिल्ह्याच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी संकल्प सभा नाट्यगृहासमोरील बागलाने इस्टेटच्या भव्य प्रांगणात होणार आहे. या दोन्हीही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम यांनी केले आहे.बीड तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात ऐतिहासिक विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी सुरु असून चौसाळा, नाळवंडी, ढेकणमोहा सर्कलमध्ये बैठका घेण्यात आल्या. या प्रसंगी ते बोलत होते. नाळवंडी सर्कलमध्ये दोन्ही कार्यक्र माच्या पार्श्वभूमीवर कॉर्नर बैठका घेण्यात आल्या.यावेळी डी.बी. बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, सुधीर काकडे, भाऊसाहेब डावकर, नंदकुमार कुटे, उत्तरेश्वर सोनवणे, प्रकाश ठाकूर, चौरंगनाथ पवार, रवि गुंजाळ, राजेंद्र पवार, बाबुराव थापडे, राम जाधव, विक्र म डोळस, सरपंच राधाकिसन म्हेत्रे, सुशील ढवळे यांच्यासह नाळवंडी सर्कलमधील कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये विजयी संकल्प सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:19 IST