- दिनेश लिंबेकरमाजलगाव (बीड): सलग १० वर्षे ट्रक ड्रायव्हर म्हणून रस्त्यावर चाकं फिरवणारा एक तरुण, आज मराठीसाहित्यात क्रांती घडवत आहे. बीड जिल्ह्यातील सादोळा येथील भारत सोळंके याने मराठी भाषेच्या प्रेमापोटी ट्रकच्या कॅबीनमधून थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडीपर्यंत मजल मारली आहे. 'मराठी राजभाषा गौरव दिना'निमित्त भारतचा हा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हॉटेलमधील काम ते ट्रक ड्रायव्हरभारतचे कुटुंब अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंब. वडिलांनी शेती विकल्याने कुटुंबाची जबाबदारी १० वीत असतानाच भारतवर पडली. कुटुंबासाठी त्याने हॉटेल, पानटपरी आणि बर्फ गोळ्याचा गाडा चालवला. पुढे उपजिविकेसाठी तो ट्रक चालक बनला. मात्र, या खडतर प्रवासात त्याने आपल्यातील 'कवी' जिवंत ठेवला होता.
ट्रकच्या कॅबीनमध्ये पुस्तकांचे व्यसनट्रक लाईनमध्ये व्यसनांची कमतरता नसते, पण भारतला पुस्तकांचे व्यसन जडले होते. दिवसभर ट्रक चालवल्यानंतर रात्री भालचंद्र नेमाडेंची 'कोसला' वाचल्याशिवाय त्याला झोप येत नसे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ट्रक नेताना नदीकाठी बसून त्याने आजवर ३०० हून अधिक कविता लिहिल्या आहेत. त्याच्या या विलक्षण प्रवासावर पुण्याच्या एफटीआयआय (FTII) संस्थेने १५ मिनिटांचा लघुपटही तयार केला आहे.
आईसाठी ट्रक विकून गाठले पुणेउच्च शिक्षणाची ओढ भारतला स्वस्थ बसू देत नव्हती. २०१७ मध्ये त्याने स्वतःचा ट्रक विकून आलेले २ लाख रुपये आईच्या नावे बँकेत जमा केले, जेणेकरून कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एम.ए. पूर्ण केले. आता त्याने 'कुसुमाग्रज व गुलजार यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास' या विषयावर आपला पीएचडी प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सादर केला आहे. लवकरच भारतच्या नावापुढे 'डॉक्टर' ही पदवी लागणार असून, ट्रक ड्रायव्हर ते संशोधक हा त्याचा प्रवास मराठी भाषेच्या समृद्धीचे एक जिवंत उदाहरण बनला आहे.
Web Summary : Bharat Solanke, a former truck driver, fueled by his love for Marathi, is pursuing a PhD comparing Kusumagraj and Gulzar's poetry. He sold his truck to fund his education after working various jobs, showcasing dedication to literature.
Web Summary : भारत सोलंके, एक पूर्व ट्रक ड्राइवर, मराठी के प्रेम से प्रेरित होकर, कुसुमाग्रज और गुलजार की कविता की तुलनात्मक अध्ययन में पीएचडी कर रहे हैं। उन्होंने अपनी शिक्षा के लिए ट्रक बेच दिया, जो साहित्य के प्रति समर्पण को दर्शाता है।