परळीत आंदोलकांना विभागीय आयुक्त भेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 15:46 IST2018-07-29T15:45:38+5:302018-07-29T15:46:21+5:30
आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळीत सुरु केलेले ठिय्या आंदोलन बाराव्या दिवशीही सुरु होते.

परळीत आंदोलकांना विभागीय आयुक्त भेटले
बीड -आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने परळीत सुरु केलेले ठिय्या आंदोलन बाराव्या दिवशीही सुरु होते. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. शनिवारी मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्राप्त संदेशपत्र मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांना देत मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती आयुक्त डॉ. भापकर यांनी केली.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे आणि तहसीलदार शरद झाडके यांनी आंदोलकांशी चर्चा केली. संदेश पत्रातील काही मुद्यांवर दुरुस्तीची मागणी करण्यात आली.