मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात तेराव्या दिवशीही आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 19:01 IST2018-07-30T18:48:52+5:302018-07-30T19:01:53+5:30
मराठा आरक्षणासाठी १८ जुलैपासून सुरु असलेले परळी येथील ठिय्या आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते.

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात तेराव्या दिवशीही आंदोलन सुरूच
बीड : मराठा आरक्षणासाठी १८ जुलैपासून सुरु असलेले परळी येथील ठिय्या आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते. तसेच आज केज तालुक्यातील धनेगाव फाटा येथे सरकारचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी घालून रास्त रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ३० युवकांनी मुंडण करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
यासोबतच बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, माजी. आ. बदामराव पंडित, विलास बडगे, दिलीप गोरे, सुभाष सपकाळ, अरुण डाके, भास्कर जाधव, अॅड. महेश धांडे, नरसिंग नाईकवाडे, विनोद मुळूक, चंद्रसेन उबाळे, सतीश काटे, जयदत्त थोटे, शेषेराव फावडे, कुंदाताई काळे, कमल निंबाळकर, अॅड. जगन्नाथ औटे, शाहेद पटेल तसेच मराठा बांधवांसह मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.