Maratha Kranti Morcha : गेवराई तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 19:44 IST2018-07-24T19:43:25+5:302018-07-24T19:44:17+5:30

Maratha Kranti Morcha : गेवराई तालुक्यात कडकडीत बंद
गेवराई (बीड ) : सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यास गेवराई तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र बंदला तालुक्यात प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी आंदोलकांनी शहरात बंदचे आवाहन केले. यानंतर शास्त्री चौक येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तालुक्यातील मादळमोही येथे बंदच परिणाम आठवडी बाजारावर झाला. तसेच तलवाडा, उमापुर, पाडळसिंगी, जातेगांव येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला. चकलांबा येथे आठवडी बाजार भरल्याने उद्या गावात बंद पाळण्यात येईल. शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. तसेच बससेवा सकाळपासुन बंद ठेवण्यात आली. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.