मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 06:16 IST2025-11-08T06:15:50+5:302025-11-08T06:16:14+5:30
"माझ्या मनात जरी कुणाला मारण्याचे पाप आले असेल, तर माझी ब्रेन मॅपिंग करा"

मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी परळीत पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या जीवे मारण्याच्या कथित कटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मुंडे यांनी हे आरोप राजकीय आणि सामाजिक जीवन संपवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. तसेच हे अटक झालेले, बोलणारे आणि कबुली जबाब देणारे सर्व जरांगेंचेच कार्यकर्ते आहेत, असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याची मागणी त्यांनी केली.
याची उत्तरे जरांगे देणार का?
मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन फायदा आहे की ईडब्ल्यूएसमध्ये जाऊन? यावर मनोज जरांगे यांनी जनतेसमोर खुली चर्चा करावी. जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. एकदा होऊनच जाऊ द्या, असे आव्हान देखील धनंजय मुंडे यांनी जरांगेंना दिले आहे.
नार्को टेस्ट करा
मुंडे म्हणाले, माझ्या मनात जरी कुणाला मारण्याचे पाप आले असेल, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. त्याचसोबत, जरांगे आणि ताब्यात असलेल्या संशयितांचीही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करावी.