अपहरण करून विवाहितेवर अत्याचार करणार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:24 IST2020-07-09T19:24:15+5:302020-07-09T19:24:37+5:30
२४ जूनपासून ७ जुलैपर्यंत विवाहितेवर अत्याचार

अपहरण करून विवाहितेवर अत्याचार करणार अटकेत
परळी (जि. बीड) : शहरातील एका विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत तिचे अपहरण करुन डांबून ठेवत अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेला आरोपीच्या गुरुवारी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
२४ जून रोजी शहरातील एका कॉलनीत राहणाऱ्या ४३ वर्षीय विवाहितेच्या घरी जाऊन इस्लामपुरा बंगला भागातील एका ३५ वर्षीय तरुणाने तिला जिवे मारण्याची धमकी देत आॅटोरिक्षामध्ये बसवत तिचे अपहरण केले. त्यानंतर १ जुलैपर्यंत अंबाजोगाई व चनई येथे तिला डांबून ठेवले.
या दरम्यान तिच्यावर अत्याचार करीत बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. ७ जुलै रोजी सदर महिला घरी आली. त्यानंतर तिने शहर पोलीस ठाण्यात २४ जूनपासून ७ जुलैपर्यंत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी शादाबखान नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शादाबखान हा सदर महिलेस त्रास देत होता.