In Malkwadi, Rs | मलकवाडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास
मलकवाडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कुटुंबातील सर्व सदस्य शेतात गेले असल्याने संधी साधत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना तालुक्यातील मलकवाडी येथे बुधवारी दुपारी उघडकीस आली.
मलकवाडी येथील शेतकरी चंद्रकांत उत्तमराव मुंडे यांनी शेतात घर बांधलेले आहे. पेरणी करावयाची असल्याने सध्या मुंडे यांच्या शेतात तण काढण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी चंद्रकांत मुंडे, त्यांची पत्नी आणि मुलगा शेतात कामासाठी निघून गेले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्यांची सून घराला कुलूप लावून शेतात आली. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सामान अस्ताव्यस्त फेकत कपाटातील सोन्याचे पट्टी गंठण, मिनी गंठण, ठुशी, अंगठी इ. सोन्याचे दागिने आणि रोख ४ हजार असा एकूण २ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला. दुपारी २ वाजता मुंडे कुटुंबीय शेतातील काम आटोपून घराकडे परतले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी चंद्रकांत मुंडे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: In Malkwadi, Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.