शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

वाल्मिक कराडला मकोका व खून प्रकरणात आरोपी करा; देशमुख कुटुंबाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:01 IST

देशमुख कुटुंबीय मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार; गावकऱ्यांनीही दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

केज(बीड): सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आत एक मोठी घडामोड समोर आली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा व त्याला सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केलीआहे. या मागणीसाठी सोमवारी(13 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण देशमुख कुटुंबीय मोबाईल टॉवरवर आंदोलन करणार असून, मागण्या मान्य न झाल्यास टॉवरवरून उडी मारून आपले जीवन संपवणार असल्याची उदविग्न भूमिका सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, यांनी प्रसार माध्यमासमोर व्यक्त केली. यामुळे आता प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 35 दिवस झाले, तरीही कृष्णा आंधळे(रा. मैंदवाडी) हा आरोपी अद्यापही मोकाटच आहे. पोलीस निरीक्षकापासून ते मुखमंत्र्यांपर्यंत सर्व यंत्रनेवर आपण विश्वास ठेऊन त्यांना सर्व पुरावे सादर केले आहेत. परंतु आरोपीच्या मोबाईलचे सीडीआर काढले का? संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपीनी कॉल व व्हीडिओ कॉल कोणाला करण्यात आले? खंडणी ते खून प्रकरणातून कोणाला तरी वाचविण्यात येते काय? असे प्रश्न धनंजय देशमुख यांनी विचारले. 

वाल्मीक कराडच्या अडचणी वाढणार, '१४१ हार्वेस्टर मशिनसाठी ८-८ लाख रुपये घेतले'; सुरेश धसांचा आरोप

तसेच, सरपंच देशमुख खून प्रकरनाच्या तपासाबाबत आपल्या माहिती दिली जात नाही. आरोपी सुटले तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबियांना संपविण्यात येणार आहे. त्यापेक्षा आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपणच मोबाईल टॉवरवर चढून वरून खाली उडी मारून आपले जीवन संपविण्याचा निर्णय गंभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचे धनंजय देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

गावकरी सामूहिक आत्मदहन करणार..!

रविवारी रात्री साडेसात वाजता मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर देशमुख कुटुंबियांसह सर्व गावाकऱ्याची  सामूहिक बैठक झाली. या बैठकीत गावाकऱ्यांनी सात मागण्या मांडल्या. या मागण्या मान्य न झाल्यास मकर संक्रातीच्या दिवशी महादेव मंदिरासमोर सर्व गावकरी अंगावर पेट्रोल ओतून, सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना सोमवारी देण्यात येणार आहे. या निवेदनावर 23 गावाकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रमुख मागण्या..!

  • वाल्मिक कराडवर मकोका लावून, सरपंच हत्येत त्याला सह-आरोपी करा
  • मोकाट कृष्णा आंधळेला अटक करा
  • शासकीय वकील म्हणून ऍड उज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करा
  • एसआयटीत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करा
  • तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना द्या
  • पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सह-आरोपी करा

या मागण्याचे निवेदन गावाकऱ्यांनी तयार केले आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस