शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करून सातजण मस्साजोगमध्ये लपले; पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:02 IST

Pune Crime: मस्साजोगमध्ये मोठी कारवाई; पुण्यात विद्यार्थ्यावर हल्ला करून पळालेले सातजण पोलिसांच्या ताब्यात

- मधुकर सिरसटकेज (बीड) : पुणे जिल्ह्यातील कारेगाव (ता. शिरूर घोडनादी) येथील एका तरुणांवर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करून तीन दुचाकीवरून पळून आलेल्या सात संशयित आरोपींना मस्साजोग शिवारातील एका पेट्रोल जवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची माहिती रांजणगाव पोलिसांनी वायरलेस वरून केज पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मस्साजोग शिवारात केज पोलिसांनी सापळा लावून सात जणांना जेरबंद केले आहे.

सौरभ श्रीराम राठोड (17) हा गंगाखेड (जि. परभणी) येथील युवक पुणे जिल्ह्यातील कारेगाव ( ता. शिरूर घोडनदी ) परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. 23 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सौरभ राठोड यास, 'तु ओंकार देशमुख यास खुन्नस देऊन का बघितलेस, ओंकार देशमुख कोण आहे? तुला माहित आहे कां? थांब तुला जिवंतच सोडीत नाहीत' अशी धमकी देत गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे (सर्व रा. कारेगाव ता. शिरूर घोडनदी) व दोन अनोळखी दोघांनी कोयत्याने वार केले. पोटात व पाठीवर वार करीत त्याच्या डोक्यात दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोडविण्यासाठी गेलेल्या यश राजू धनवटे यास हाताने व लाथाबुक्यांनी मारून दमदाटी केली. सौरभ राठोड याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून यश धनवटे याच्या फिर्यादीवरून वरील सात जणांसह इतर अनोळखी दोघांविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास करीत होते.

आरोपीचे लोकेशन मस्साजोग शिवारातया प्रकरणातील सातही आरोपी हे दुचाकीवरून बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्साजोग  शिवारात पळून गेल्याची तांत्रिक माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाले. हीं माहिती त्यांनी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांना भ्रमनध्वनी वरून दिली. पाटील यांनी तात्काळ पोलीस उप निरीक्षक उमेश निकम, फौजदार मांजरगे, जमादार उमेश आघाव, बाळासाहेब अहंकारे यांचे पथक या परिसरात रवाना केले. या पथकाने सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना मस्साजोग शिवारातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरातून जेरबंद केले. सातही आरोपींना रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडStudentविद्यार्थीArrestअटकPune Crimeपुणे क्राईम बातम्या