मृत सरपंच देशमुख यांच्या कुटूंबीयांसाठी माजलगावात एका तासांत १४ लाखांचा मदतनिधी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 18:59 IST2024-12-11T18:58:54+5:302024-12-11T18:59:15+5:30

शुक्रवारी शहरामध्ये मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस मदत संकलन करण्यात येणार आहे.

Majalgaonkar again rushed to help; A relief fund of 14 lakhs was raised in an hour for the deceased Sarpanch Deshmukh's family | मृत सरपंच देशमुख यांच्या कुटूंबीयांसाठी माजलगावात एका तासांत १४ लाखांचा मदतनिधी जमा

मृत सरपंच देशमुख यांच्या कुटूंबीयांसाठी माजलगावात एका तासांत १४ लाखांचा मदतनिधी जमा

माजलगाव ( बीड) : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले आहेत. माजलगावकरांनी मात्र कठीण काळात पाठीशी उभा राहण्याची परंपरा जोपासत मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांना मदतीचा हात दिला आहे. आज विविध पक्ष व संघटनांच्या झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अवघ्या एका तासांत १३ लक्ष ६८ हजार रूपयांची मदत निधी जाहिर झाली. दरम्यान, शुक्रवारी शहरातील संभाजी महाराज चौकातून सकाळी १० वाजता मदतफेरीचे आयोजनही करण्यात आले असून यावेळी प्रशासनाला निवेदन देखील देण्यात येणार आहे.

शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात बुधवारी आमदार प्रकाश सोळंके यांच्यावतीने विविध सामाजिक संघटना, व्यापारी महासंघ, वकील संघटना, पतसंस्था संघटना, पत्रकार संघ, रोटरी क्लब, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथील जवान चंद्रशेखर मोरे यांच्या कुटूंबीयांना दिलेल्या मदतीप्रमाणेच देशमुख कुटूंबीयांना देखील मदत देण्यासाठी निर्णय घेण्यात आला. यानंतर मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांना मदत व्हावी यासाठी शुक्रवारी शहरामध्ये मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून सात दिवस मदत संकलन करण्यात येणार आहे. यासाठी या मदतफेरीस सर्व संघटना, पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. झालेल्या घटनेचा निषेध करत सरपंच संतोष देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, परभणी येथे संविधान अवमान घटनेचाही निषेध या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.

मयत संतोष देशमुखांच्या कुटूंबीयास आर्थिक मदत म्हणून मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून मदतफेरीस सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन रोटरी क्लब, व्यापारी महासंघ, वकील महासंघ व पत्रकार संघाने केले आहे.

Web Title: Majalgaonkar again rushed to help; A relief fund of 14 lakhs was raised in an hour for the deceased Sarpanch Deshmukh's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.