माजलगाव : सात लाखांचे डिझेल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:07 IST2018-10-10T00:06:43+5:302018-10-10T00:07:20+5:30
पेट्रोल पंप सुरू होण्याआधीच तेथील तब्बल सात लाख रूपये किंमतीचे डिझेल चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. मंगळवारपर्यंत याप्रकरणात गुन्हा नोंद नव्हता.

माजलगाव : सात लाखांचे डिझेल चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : पेट्रोल पंप सुरू होण्याआधीच तेथील तब्बल सात लाख रूपये किंमतीचे डिझेल चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. मंगळवारपर्यंत याप्रकरणात गुन्हा नोंद नव्हता.
माजलगाव परभणी या राष्ट्रीय महामार्गावर पावरवाडी फाट्याजवळ इंडियन आॅइल या कंपनीच्या पेट्रोल पपंचे काम चालू आहे. सदरील काम हे जवळपास पूर्ण झाले होते. दसऱ्यादिवशी याचे उद्घाटन होणार होते. तत्पूर्वीच येथील टँकमध्ये पेट्रोल व डिझेल भरण्यात आले होते. चोरट्यांनी संधी साधून तब्बल सात लाख रूपयांचे डिझेल चोरी केले. पंप चालक किशोर सत्यनारायण उनवने यांना सोमवारी हा प्रकार निदर्शनास आला.
माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मंगळवारी उशिरापर्यंत याप्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता.