परळीतील वैद्यनाथ मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 19:16 IST2021-08-30T19:13:37+5:302021-08-30T19:16:39+5:30
प्रभू वैद्यनाथ कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

परळीतील वैद्यनाथ मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात
परळी (जि. बीड) : शहरातील मंदिर बंद असल्याने यावर्षी श्रावण महिन्याच्या अनुषंगाने ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथनगरीत सोमवारी महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ५१ जोडप्यांच्या उपस्थितीत महारुद्राभिषेक करण्यात आला. सोमवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनीही पायरीचे दर्शन घेतले.
प्रभू वैद्यनाथ कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी उपस्थित होते. जवळपास ५१ विविध धार्मिक रुद्राभिषेक, साहित्य आयोजकांनी उपलब्ध केले होते. पहाटे पर्जन्यवृष्टी, महारुद्राभिषेक, प्रारंभी प्रभू वैद्यनाथ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. चंदुलाल बियाणी, तहसीलदार बाबूराव रूपनर, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, राजस्थानी मल्टिस्टेट उपाध्यक्ष बालचंद लोढा, अभय वाकेकर, विजय लड्डा, प्रा. अतुल दुबे, अजय पुजारी, रामेश्वर कोकाटे महाराज, सचिन स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उत्तमजी शास्त्री, निरंजन शर्मा महाराजांनी धार्मिक मंत्रोच्चारण करीत महारुद्राभिषेक केला.
कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी, ओम मुंदडा, महेश भंडारी, अनंत भाग्यवंत, राजेश मोदाणी, राहुल देशमुख, तोष्णीवाल काकाजी, संजय देवधरे, अनंत तुमसमुद्र, जगन्नाथ रामदासी, ऋषिकेश चव्हाण, ईश्वर जठार, नरेश लोखंडे यांच्यासह भाविकांनी परिश्रम घेतले.