शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Maharashtra Election 2019 : धोंडे ऐतिहासिक रेकॉर्ड करणार की आजबे बाजी मारणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 8:41 PM

आष्टीत रंगणार दुरंगी लढत 

ठळक मुद्देनऊ उमेदवार मैदानातआष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात विभागलेला मतदारसंघ

- अविनाश कदम

आष्टी विधानसभा मतदारसंघ हा आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याचा मिळवून हा भौगोलिकदृष्ट्या मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. या संघातील पुरूष मतदार १ लाख ९६ हजार ५१३ स्त्री मतदार १ लाख ७३ हजार ५४५ मतदार असे एकूण ३ लाख ७० हजार ५८ असे एकूण मतदार आहेत. ४३८ मतदान केंद्र आहेत. अंतिम रिंगणात आ. भीमराव धोंडे भाजप, बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस, विष्णू गाडेकर बहुजन समाजपक्ष, नामदेव सानप वंचित बहुजन आघाडी, राजाभाऊ देशमुख लोकतांत्रिक आघाडी, संजय खांडेकर लोकसेवा पार्टी, दादा तासतोडे अपक्ष, ज्ञानदेव थोरवे अपक्ष, तुकाराम काळे आंबेडकरराईट आॅफ पार्टी हे नऊ उमेदवारांत लढत होणार आहे.

आष्टी विधानसभा निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहिला तर चार वेळा आमदार होण्याचा मान भाजपचे उमेदवार आ. भीमराव धोडे यांनी मिळविला आहे. त्या पाठोपाठ दुसरा मान आ. सुरेश धस यांनी तीनवेळा विधानसभा तर एक वेळा विधान परिषद जिंकली. चार वेळा आमदार आता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आ.धोंडे निवडून आले तर ऐतिहासिक रेकॉर्ड होईल. 

आष्टी विधानसभा २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या आ. भीमराव धोडे यांनी राकाँचे उमेदवार आ. सुरेश धस यांचा थोड्या मताने पराभव केला. त्यावेळी बाळासाहेब आजबे यांनी भाजपाच्या उमेदवारी मिळविण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडे प्रयत्न केले होते. मात्र ऐनवेळी माघार घ्यावी लागली. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळ आहे. भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेले माजी आ. साहेबराव दरेकर, जयदत धस, अमोल तरटे यांना पंकजा मुंडे व पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश शिंदे यांनाही ऐनवेळी माघार घ्यावी लागली. 

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- आष्टी तालुक्यात सतत पाणी टंचाईसाठी उपाययोजना काहीच नाही मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. युवकांना रोजगारासाठी ओद्योगिक वसाहत, कडा कारखाना आणि सूतगिरणी सुरू होणार की नाही? याबाबत साशंकता असून, पाणी टंचाईचा प्रश्न मुख्य आहे.- राज्य राष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या तालुक्याच्या गावाला स्टेडियम नाही, आष्टी व कडा बसस्थानकाची दुरवस्था निधी मंजूर झाला तरी कामाला सुरु वात झाली नाही. यामुळे खेळाडूंना सराव करणे अवघड होऊन बसले आहे. याकडे मात्र दुर्लक्षच आहे.- हा मतदारसंघ दुष्काळी भागात  येतो. बहुतांश मतदार हे शेतमजूर, उसतोड कामगार आहेत. या भागात नेहमीच पर्जन्यमान अतिशय कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. शेतीसाठी पाण्याचा विचारच करू शकत नाहीत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात कुणालाही यश आले नाही.

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूभीमराव धोंडे (भाजपा)- मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था, बहुतांशी ग्रामपंचायती, कृउबा या संस्था भाजपच्या ताब्यात  - शांत व संयमी अशी ओळख असल्याने वीस वर्षे आमदार राहिले. - पाच वर्षांत राज्य व केंद्राच्या  माध्यमातून कोट्यवधींची रस्ते व विकास कामे केली.

बाळासाहेब आजबे (रा.काँ.)- माजी आमदार भाऊसाहेब आजबे यांचे चिरंजीव अन् नि:स्वार्थ स्वभाव.- जनतेच्या सुख दु:खात सहभागी होतात. - भाजपमध्ये असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांना निष्ठेने साथ दिली. - सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरतात. 

नामदेव सानप (वंचित बहुजन आ.)- मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून ओळख असल्याने फायदा - पाटोदा तालुक्यातील जनतेला हक्काचा उमेदवार मिळाला - बलाढ्य उमेदवार एकीकडे आहेत. - सर्वसामान्य म्हणून वंचिताचे हक्काचे उमेदवार असल्याने मतदारांच्या भेटी घेत आहेत.

राजाभाऊ देशमुख (लोकतांत्रिक जनता दल)- मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन केले - १९७५ मध्ये मराठवाडा विकासाच्या प्रश्नांवर एक महिना भर जेल मध्ये होते. - क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव आहे. - मतदारांना आपले विचार प्रचारात पटवून सांगत आहेत.

2०14 चे चित्रभीमराव धोंडे (भाजपा-विजयी)  सुरेश धस (राकाँ -पराभूत) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Beedबीडashti-acआष्टीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस