शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

Maharashtra Election 2019: भगवान गडावर घुमला राष्ट्रभक्तीचा नारा; महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरचा मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 2:39 PM

तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचं आहे. तुमची सेवा करण्याचं काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते.

परळी - आपल्या सर्व जणांना एकत्र करण्याची शक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती, देशाच्या हितासाठी धाडसी निर्णय घेणारे अमित शहांनी 370 कलम हटवून न्याय दिला त्यामुळे त्यांना 370 ध्वजांची सलामी देण्यात आली. भक्तांची गर्दी भविष्याची दिशा बदलेल, मतांसोबत मनंही जिंकायचं आहे, अशा शब्दात दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अमित शहांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचं आहे.गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केलं ते पुढे सुरु ठेवायचं आहे. माझ्या भावांना कोयता उचलण्याची वेळ येऊ नये असं कार्य करायचं आहे. आज माझ्या संघर्षाने मला तुम्ही कौतुकाची थाप दिली. शेवटपर्यंत तुमचा स्वाभिमान अन् सन्मानासाठी काम करायचं आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचं आहे. तुमची सेवा करण्याचं काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. 4 वर्षापूर्वी अहंकराचा गड उतरून नवी सुरुवात केली. तुमच्या उपस्थितीतने मला शाबासकी मिळाली आहे, नेतृत्वाची शाबासकी मिळणं हे मोठं भाग्य आहे. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी काम केलं. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केलं असं पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

यावेळी अमित शहांनी कलम 370 हटविण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. कलम 370 हटवून संपूर्ण देशाला एक केलं. तुम्ही 300 जागा दिल्या मोदींनी 370 कलम हटवलं. 70 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या गोष्टी मोदींनी पूर्ण केल्या. मोदींनी ओबीसीसाठी आयोगाची स्थापना केली. कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाषणात सांगितले. भगवानबाबांनी लोकांसाठी आयुष्य वेचलं. शिक्षणाचा विचार लोकांमध्ये रुजावलं. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. मोदींचे कार्य घराघरापर्यंत पोहचवा असं आवाहनही यावेळी अमित शहांनी केलं. यावेळी मंचावर भाजपाचे बीड आणि परिसरातील सर्व उमेदवार उपस्थित होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाArticle 370कलम 370Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडे