'तुम्ही बघाच, उद्या संध्याकाळपर्यंत ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 03:24 PM2018-10-18T15:24:11+5:302018-10-18T15:28:12+5:30

ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार, उसतोड कामगारांना वीमा मिळणार. उसतोड कामगारांना आरोग्य सुविधा मिळणार,

'Mahadev Mahamandal will be announced till tomorrow evening' | 'तुम्ही बघाच, उद्या संध्याकाळपर्यंत ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार'

'तुम्ही बघाच, उद्या संध्याकाळपर्यंत ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होणार'

googlenewsNext

बीड - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून यंदा प्रथमच सावरगाव येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना ऊसतोड कामगार महामंडळांची घोषणाच मुंडेंनी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्याचा दिवस मावळेपर्यंत ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा होईल, हे वचन मी तुम्हाला देते, तुम्ही बघाच असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. 

ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार, उसतोड कामगारांना वीमा मिळणार. उसतोड कामगारांना आरोग्य सुविधा मिळणार, असे सांगत पंकजा यांनी एकप्रकारे सावरगावच्या मेळाव्यातून ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणाच केली आहे. सावरगाव येथे यंदा प्रथमच दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी अ.नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केल जात होतं. पण, या वर्षीपासून भगवान बाबांच्या गावात हा मेळावा होत आहे. या गावी आपण भक्ती घेऊन यायचं आणि शक्ती घेऊन जायचं, असे पंकजा यांनी म्हटले. तसेच अनेकांनी भगवान बाबाचं मंदिर बांधताना टीका केली. भगवान बाबांच मंदिर कशासाठी, स्मारक कशासाठी असेही काहीजण म्हणाले. पण, महाराष्ट्रात पोहोचलेल्या भगवान बाबांचं त्यांच्या गावात मंदिर का नको, असा प्रश्न पंकजा यांनी उपस्थित केला. तसेच हे मंदिर म्हणजे भगवान बाबांच्या भक्तांचं श्रद्धास्थान असल्याचेही पंकजा यांनी म्हटले.

Web Title: 'Mahadev Mahamandal will be announced till tomorrow evening'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.