आष्टीत महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 15:58 IST2021-11-29T15:42:12+5:302021-11-29T15:58:14+5:30
आंदोलनापूर्वी शेतकऱ्यांनी गांधीगिरी करत महावितरण कार्यालयाचे पूजन केले

आष्टीत महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन
आष्टी ( बीड ) : शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बील वसुली, कृषी पंपाची जोडणी तोडणी करून महावितरण मनमानी करत आहे. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांच्यासह शेतकऱ्यांनी आज महावितरण उपअभियंता कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन केले.
महावितरणने तालुक्यातील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे, त्यांच्याकडून ८ हजार रूपये भरना करून घेत आहे. यामुळे शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहे, याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज महावितरण कार्यालयचे हार,अगरबत्ती लावून पूजन केले. त्यानंतर गांधीगिरी करत उपअभियंता कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांच्यासह शेतकऱ्यांनी लोटांगण घेत आंदोलन केले.
वीज बील प्रती जोडणी ३ हजार रूपये घ्यावेत, त्यासाठी ८ दिवसांच्या अवधी द्यावा, थ्रीफेज वीज वाहिंनी नियमीत करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. यावेळी हभप झुंबर महाराज बोडखे, परमेश्वर घोडके, सरपंच राम बोडखे, ज्ञानेश्वर चौधरी, सचिन आमले,कासम शेख ,माऊली थोरवे,बाबु धनवडे,छगन साबळे,धनंजय फिसके, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.