Vinayak Mete: मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 11:05 IST2022-08-14T11:05:05+5:302022-08-14T11:05:37+5:30
धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे

Vinayak Mete: मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार
बीड/परळी - बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेते, माजी आ. विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची व माझी व्यक्तिगत देखील हानी झाली आहे, मी एक मार्गदर्शक व मित्र गमावले. त्यांचे मराठा आरक्षण, ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विनायकराव मेटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे. शिवस्मारक समिती, मराठा आरक्षण आदी विषयांमधून मेटे यांनी आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून दिले होते. केज तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनायकरावांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून आपले आमदार निवडून आणले, याचा मित्र म्हणून नेहमीच अभिमान वाटायचा. ईश्वर मेटे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावनिक शब्दात धनंजय मुंडे यांनी विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, माजी आ. विनायकराव मेटे यांचे आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघाती निधन झाले होते. मागील अनेक वर्षे तर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम करत होते. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
रामदास तडस, खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र.
विनायक मेटे हे चळवळीतल नेतृत्व होत,माझे जवळचे मित्र ते होते,मेटे यांचं निधन हा सर्व महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का आहे, एक मोठा नेता आपण गमावला अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली
रवी राणा, आमदार