उपकेंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:21 IST2018-10-03T00:20:39+5:302018-10-03T00:21:25+5:30
तालुक्यातील माली पारगाव सबस्टेशनवरील वाघोरा फिडरवरील सात ते आठ गावाचा विद्युत पुरवठा मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे संतप्त गावकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता सबस्टेशनला कुलूप ठोकले.

उपकेंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील माली पारगाव सबस्टेशनवरील वाघोरा फिडरवरील सात ते आठ गावाचा विद्युत पुरवठा मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे संतप्त गावकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता सबस्टेशनला कुलूप ठोकले.
माली पारगाव सबस्टेशनवरील वाघोरा फिडरवरु न पुरु षोत्तमपुरी, वाघोरा, मालीपारगाव, मंगरुळ, मालेवाडी आदी गावे व तांड्यांना विद्युत पुरवठा होतो. परंतु दीड महिन्यांपासून येथील अधिकारी व कर्मचाºयांच्या गलथान कारभारामुळे दीड महिन्यापासून वीज खंडित होत आहे. सध्या पाऊस नसल्याने व तापमान वाढल्याने पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. सध्या पैठण धरणातून पाणी सुटलेले असताना विजेअभावी शेतकºयांना सिंचन करणे अवघड झाले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना गावकºयांनी वेळोवेळी तोंडी व लेखी निवेदन देऊनही दुर्लक्ष केले गेले. संतप्त होऊन नागरिकांनी सबस्टेशनला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले. पं.स. सभापती जयदत्त नरवडे, मालेवाडीचे सरपंच संजय नरवडे यांच्या नेतृत्वाखाली हनुमंत बादाडे, तुकाराम सोळंके, शिवाजी सोजे यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला.