भरधाव कंटेनरने दुचाकीला उडवले; गंभीर जखमी वडिलांचा मुलींसमोरच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:01 IST2020-12-31T18:01:15+5:302020-12-31T18:01:43+5:30
या भीषण अपघातात मृताच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

भरधाव कंटेनरने दुचाकीला उडवले; गंभीर जखमी वडिलांचा मुलींसमोरच मृत्यू
कडा : बीड-नगर रोडवरील महेंद्रवाडी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. दिलीप रघुनाथ मुळीक (३८ ) मृताचे नाव आहे. या भीषण अपघात त्यांच्या दोन मुलीसुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील दिलिप रघुनाथ मुळीक हे सकाळी त्यांच्या दोन मुलींसोबत दुचाकीवरुण ( क्रमांक MH.23, AM.1930 ) बीड येथे कामानिमित्त आले होते. काम पूर्ण करून ते बीडवरून गावाकडे परतत होते. यावेळी बीड-धामणगांव-नगर रोडवरील महेंद्रवाडी येथे नगरवरून बीडकडे येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने ( MH 14, HG.2699 ) त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दिलीप मुलीक जागीच ठार झाले. तर त्यांच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे.