List of 3 farmers from Telgaon, Nitrud | तेलगाव, नित्रुडच्या ६५५ शेतकऱ्यांची यादी जाहीर

तेलगाव, नित्रुडच्या ६५५ शेतकऱ्यांची यादी जाहीर

ठळक मुद्देकर्जमाफी : जिल्ह्यात ३ लाख ३ हजार ९२५ शेतकरी पात्र, २८ पासून होणार याद्या जाहीर

बीड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोमवारी धारूर तालुक्यातील तेलगाव आणि माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील पात्र ६५५ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. त्यानुसार संबंधित शेतकरी आपले सरकार केंद्रावर लॉगिन करुन त्यांच्या माहितीबाबत खात्री करुन घेत होते. सायंकाळपर्यंत २५० शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान येत्या २८ तारखेपासून सर्वच पात्र शेतक-यांची यादी टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार २४ फेब्रुवारी रोजी याद्या शासनाच्या पोर्टलवर जाहीर झाल्या. तेलगाव आणि नित्रुड येथील बॅँका, सेवा संस्था, आपले सरकार सेवा केंद्रांनी पोर्टलवरील याद्या डाऊनलोड करून चावडी, सोसायटी कार्यालय, बॅँकांमध्ये डकविल्या. या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक शिवाजीराव बडे, आपले सरकार केंद्राचे अधिकारी रविंद्र धुमाळ, जिल्हा बॅँक तसेच राष्टÑीयकृत बॅँकांच्या अधिका-यांनी भेटी दिल्या.
दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत २५० शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले होते. आॅनलाईन प्रक्रिया असल्याने उर्वरित शेतकरीही आधार प्रमाणीकरण करण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी ज्यांना आधार प्रमाणीकरणाचे नोंदपत्र मिळाले ते कर्जमाफी होणार असल्याने समाधानी दिसत होते.
तक्रार आहे का ? खात्री करून घ्या....
चावडी, सोसायटी, बॅँकांत अवलोकनार्थ लावलेल्या यादीनुसार पात्र शेतकरी लॉगिन करून त्यांच्या आधार क्रमांक, बॅँक खाते क्रमांक, कर्ज खाते रक्कम याबाबत खात्री करुन घेत होते. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत तेलगाव येथे ६१ तर नित्रुड येथील ६७ शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण केले होते. तक्रार आहे का? असाही प्रश्न विचारला जात होता.
माहिती अमान्य असेल तर होणार निवारण
यादीचे अवलोकन करताना ज्या शेतक-यांना त्यांच्या नोंदीत माहिती मान्य नसेल तर त्याचा आपोआप पोर्टलवर तक्रार अर्ज तयार होतो. सदर तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे निराकरणासाठी पोहचणार आहे. या समितीचेअध्यक्ष जिल्हाधिकारी असून जिल्हा उपनिबंधक, जिल्हा परिषदेचे सीईओ, बॅँकांचे नोडल अधिकारी, जिल्हा अग्रणी बॅँकेचे अधिकारी व जिल्हा कृषी अधिकाºयांचा समितीमध्ये समावेश आहे.

Web Title: List of 3 farmers from Telgaon, Nitrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.