विजेचा धक्का; शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:35 IST2019-02-03T00:34:08+5:302019-02-03T00:35:05+5:30
शेतात काम करत असलेल्या शेतक-याचा विद्युत तारेस स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसून मृत्यू झाला.

विजेचा धक्का; शेतकऱ्याचा मृत्यू
बीड : शेतात काम करत असलेल्या शेतक-याचा विद्युत तारेस स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी परळी तालुक्यातील हाळम येथे घडली. बालाजी रामराव मुंडे (वय ३७, रा. हाळम, ता. परळी) असे त्या शेतकºयाचे नाव आहे. बालाजी मुंडे शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्वत:च्या शेतात काम करत होते. यावेळी शेतातून गेलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाला.
यावेळी विजेचा जोरदार झटका बसल्याने ते गंभीर जखमी झाले. अति गंभीर अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.