लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्यात कैद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 19:37 IST2024-09-23T19:36:48+5:302024-09-23T19:37:38+5:30
वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्यात कैद!
- नितीन कांबळे
कडा ( बीड): मागील अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या बिबट्याने तीन चार शेळ्याचा फडशा पाडल्यानंतर रविवारी रात्रीच्या दरम्यान शेतकर्याच्या बिबट्या कॅमेर्यात कैद झाल्याचे दिसुन आले असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे मागील अनेक दिवसांपासून एका बिबट्याचे वास्तव्य असून आज पर्यंत या परिसरात तीन चार शेळ्याचा फडशा पाडला आहे.वनविभागाला कळवले असून वनविभागाचे कर्मचाऱ्यानी गावात येऊन पाहणी केली आहे.रविवारी रात्री याच परिसरात बिबट्या फिरताना एका शेतकऱ्याने त्याला आपल्या कॅमेर्यात कैद आहे. बिबट्या निदर्शनास पडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी गणेश खाडे यानी केली आहे.
याबाबत आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय ढगे याना विचारणा केली असता ते म्हणाले की, या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार असून कर्मचारी देखील गावात जाऊन आले आहेत. त्याच बरोबर एका शेळीला मारले असून त्याचा पंचनामा करण्यात आला असल्याचे त्यानी लोकमतला सांगितले.