महावितरण आॅफिसच्या गेटला कुलूप लावून कार्यकर्ता झाला फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:46 IST2019-03-05T23:43:42+5:302019-03-05T23:46:04+5:30
शहरातील जालना रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या मुख्य गेटला कुलूप लावून एक कार्यकर्ता फरार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महावितरण आॅफिसच्या गेटला कुलूप लावून कार्यकर्ता झाला फरार
बीड : शहरातील जालना रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या मुख्य गेटला कुलूप लावून एक कार्यकर्ता फरार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक वाकडे (रा.बीड) असे या आरोपीचे नाव आहे. वाकडे हा एका पक्षाचा कार्यकर्ताही आहे. मंगळवारी दुपारी तो महावितरण कार्यालयात गेला. ‘माझ्या आईला बील का आकारले’ असे म्हणत त्याने येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर बाहेर येत सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करीत प्रवेशद्वाराला कुलूप लावून तो पसार झाला. याप्रकरणात तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
सायंकाळीही महावितरणचे अधिकारी, कर्मचारी शिवाजीनगर ठाण्यात तळ ठोकून होते. पोनि शिवलाल पुरभे यांच्यापुढे ते आपले कैफियत मांडत होते. लिपीक पुरी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
वाकडे याने आपल्या आईला बिल का आकारले? असे म्हणत येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर सुरक्षा रक्षकालाही शिवीगाळ केली.