शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख मागील ८-१० दिवसांत उतरला असून, खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचा आलेख मागील ८-१० दिवसांत उतरला असून, खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल ६५ टक्क्यांनी घटली आहे. त्याबरोबरच मृत्युदरही घटला आहे. यामुळे नागरिकांतील चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

माजलगाव तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून जसजशा कोविड तपासण्या सुरू झाल्या तसतशी रुग्णसंख्या वाढली. त्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात निघू लागली. यामुळे शहरातील शासकीय एक व खाजगी ८ कोविड हॉस्पिटल व ६ कोविड सेंटर हाऊसफुल्ल होऊन रुग्णांना प्रतीक्षा करण्याची वेळ येत होती. परिणामी, एके दिवशी सर्व ठिकाणच्या रुग्णांची संख्या ६०० पर्यंत पोहोचली. तर सध्या काही खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकही रुग्ण दिसून येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

येथील देशपांडे हॉस्पिटल व यशवंत कोविड हॉस्पिटलला मागील वर्षापासून मान्यता होती. तर मागील दोन महिन्यांत सहा खाजगी कोविड हॉस्पिटल व एक शासकीय कोविड हॉस्पिटल सुरू केले. अन्य ५-६ ठिकाणीदेखील कोविड सेंटर सुरू करण्यात आले.

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शासकीय ३० खाटा व खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये ३०० अशा एकूण ३३० खाटांची मान्यता आहे. १५ दिवसांपूर्वी हे सर्व बेड हाऊसफुल्ल होते. मात्र आता रुग्णसंख्या ६५ टक्क्यांनी घटली आहे. सध्या खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये १२० रुग्ण उपचार घेत आहेत तर शासकीयमध्ये ३० रुग्ण उपचार घेत आहेत. सर्व ठिकाणी मिळून रुग्णसंख्या १५० च्या आसपास आहे.

शासनाने १९ मेपासून गृह विलगीकरण बंद केल्याने कोविड सेंटरमध्ये सध्या किरकोळ लक्षणे असणाऱ्या ३३५ रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कमी दिवसांत जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोनाचे रुग्ण वाढीच्या तीव्र काळात मृत्युदरदेखील वाढला. एका दिवसात तब्बल ८-१० मृत्यू झाले होते. मागील दीड महिन्यात १०९ रुग्णांचे मृत्यू झाले. तर मागील दहा दिवसांत १० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नगर परिषदेचे कोविड पथकप्रमुख संतोष घाडगे यांनी सांगितले. यामुळे मागील आठ दिवसांत माजलगाव तालुक्यातील मृत्युदरदेखील घटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

माजलगाव तालुक्यातील रुग्णसंख्या व मृत्युदर या दोन्हींचाही आलेख घटला असला तरी यापुढेदेखील नागरिकांनी कोविड नियमांचे पालन केले तरच आपला तालुका लवकरच शून्य रुग्णसंख्येवर येऊ शकतो.

- डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.