कबुतर चोरीच्या भांडणातील मध्यस्थाची हत्या; एक आरोपी आठ दिवसानंतर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 19:03 IST2019-11-30T19:02:58+5:302019-11-30T19:03:47+5:30

पोलिसांनी आरोपीस गंगाखेड मधून ताब्यात घेतले

Killing a middleman in a pigeon theft dispute; One accused detained eight days later | कबुतर चोरीच्या भांडणातील मध्यस्थाची हत्या; एक आरोपी आठ दिवसानंतर अटकेत

कबुतर चोरीच्या भांडणातील मध्यस्थाची हत्या; एक आरोपी आठ दिवसानंतर अटकेत

परळी : सात दिवसांपूर्वी सिद्धार्थनगरात कबुतर चोरीच्या भांडणात मध्यस्थी करताना धीरज चव्हाण यांची हत्या झाली होती. या प्रकरणात संभाजीनगर पोलिसांनी एका आरोपीस गंगाखेड येथून शनिवारी ताब्यात घेतले. सिद्धार्थ भारत रोडे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, दोन महिन्यापूर्वी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून दि 23 नोव्हेंबर रोजी  सकाळी साडेदहा च्या सुमारास आकाश धीरज चव्हाण व त्याच्या भावास दोघेजण मारहाण करत होते. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या धीरज चव्हाण ( वय 43) यांची झटापटीत हत्या करण्यात आली. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस स्थानकात सिद्धार्थ रोडे ( २७, रा. इंदिरानगर ) व अन्य एका विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सिद्धार्थ रोडे हा गंगाखेड येथे असल्याची खबर मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई अंबाजोगाईच्या अतिरिक्त  जिल्हा पोलिस अधीक्षक  स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली  संभाजीनगर पोलिसांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते करत आहेत 
 

Web Title: Killing a middleman in a pigeon theft dispute; One accused detained eight days later