Justice should be given to the needy along with the common people | सर्वसामान्यांसह गरजूंना न्याय द्यावा

सर्वसामान्यांसह गरजूंना न्याय द्यावा

: नवनियुक्त शासकीय समिती सदस्यांचा सत्कार

केज : शासकीय समित्यांच्या माध्यमातून तालुक्यातील गरीब व सर्वसामान्य लोकांची विधायक कामे करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन काँग्रेसचे नेते आदित्य पाटील यांनी केले.

शासकीय समितीच्या नवनियुक्त सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नियुक्ती झालेल्या सदस्यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न समितीच्या माध्यमातून मार्गी लावावेत. माजी खा. रजनी पाटील व अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी मिळून काम करू असा विश्वासही त्यांनी व्यक केला.

यावेळी केज तालुका समन्वय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झालेले युवराज जाधव (नांदूर), सुमेधा प्रविणकुमार शेप (केज) संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य प्रणिता संतोष सोनवणे, कपिल अंबादास मस्के, वचिष्ठ सांगळे, रोजगार हमी योजना समितीचे सदस्य श्रीमंत नामदेव लोंढे व क्रांती रामराजे शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ मेटे बापू, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेंद्रे, पशुपतीनाथ दांगट, कबिरोदिन इनामदार, अमर पाटील, अमोल डोईफोडे, समीर देशपांडे, लक्ष्मण जाधव, डी.डी. बनसोडे, दिनकर राऊत, प्रताप मोरे, सुनिल देशपांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Justice should be given to the needy along with the common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.