चार दिवसांत फक्त ३७२ व्यापाऱ्यांनी केली कोविड चाचणी; ३ बाधित, ..तर दुकानाला लागणार टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST2021-03-05T04:34:02+5:302021-03-05T04:34:02+5:30
व्यावसायिक व्यापारी कामगार यांनी कोविड चाचणी न केल्यास ६ मार्चपासून दुकानाला टाळे लावून दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याची ...

चार दिवसांत फक्त ३७२ व्यापाऱ्यांनी केली कोविड चाचणी; ३ बाधित, ..तर दुकानाला लागणार टाळे
व्यावसायिक व्यापारी कामगार यांनी कोविड चाचणी न केल्यास ६ मार्चपासून दुकानाला टाळे लावून दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली. कोरोना तपासणी मोहिमेत सर्व व्यापारी, कामगार, व्यावसायिक यांनी सहभागी व्हावे, तपासणी करून घ्यावी अन्यथा व्यवसाय बंद ठेवण्यात येतील, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
तपासणी मोहीम ५ मार्चपर्यंत चालू राहणार आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील व्यापारी, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, दूध संकलन केंद्र, दूध घरोघरी पोहोच करणारे, खासगी बँकेचे कर्मचारी, दुकानातील कामगार आदींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
शहरातील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील इमारतीत कोविड सेंटर उभारण्यात आले असून या ठिकाणी गुरुवारी सकाळपासून व्यापारी, कामगार, व्यावसायिक यांनी कोविड चाचणीसाठी आले असता घेतलेले छायाचित्र.
===Photopath===
040321\rameswar lange_img-20210304-wa0027_14.jpg