नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 19:25 IST2019-08-13T19:22:40+5:302019-08-13T19:25:52+5:30

चौथ्या दिवशी आले पाणी

jayakwadi's Nathsagar dam's water enters in the Majalgaon Dam | नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात दाखल

नाथसागराचे पाणी माजलगाव धरणात दाखल

ठळक मुद्देचार दिवसापूर्वी नाथ सागर धरण हे ८० टक्के भरल्याने सोडले पाणी

माजलगाव (बीड ) : पैठण येथील नाथसागर धरणाची पाणी पातळी चार दिवसांपूर्वी ८० टक्क्यांचवर गेल्याने धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५  वाजता माजलगाव धरणात आल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

नाथसागर धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने थैमान घातले होते त्यामुळे नाथसागर धरण हे केवळ चार दिवसात भरत आले. तर दुसरीकडे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नाथसागरातुन माजलगाव धरणात उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली.

चार दिवसापूर्वी नाथ सागर धरण हे ८० टक्के भरल्याने येथुन माजलगाव धरणात कालव्याद्वारे ९00 क्युसेकने ९ ऑगस्टपासून पाणी सोडण्यात आले. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव धरणात पोहोचले. यामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यासोबतच या पाण्यामुळे बीड व माजलगाव शहरासह अनेक गावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Web Title: jayakwadi's Nathsagar dam's water enters in the Majalgaon Dam