शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

'आता बस्स झालं, मी नोकरी सोडतेय'; महिला डॉक्टरचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 18:31 IST

गावातील काही राजकीय लोकांनी आरोग्य केंद्रात येऊन वाद घालणे सुरू केले.

- सोमनाथ खताळबीड : खूप दिवसांपासून मी एकटीच काम करतेय. तरीही कोणीही येतेय आणि मलाच बोलतेय. त्यामुळे आता बस्स झालं. मला खुप त्रास होतोय, म्हणून मी नौकरी सोडतेय, असा हस्तलिखीत अर्ज महिला डॉक्टरने मॅग्मो संघटनेच्या सोशल मिडीयावरील ग्रुपवर टाकला आहे. गेवराई तालुक्यातील जातेगाव ग्रामस्थांबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. या प्रकाराने डॉक्टरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जातेगाव आरोग्य केंद्रात डॉ.प्रकाश फड व डॉ. पल्लवी झोपडे हे दोन वैद्यकीय कार्यरत आहेत. ८ मार्च पासून डॉ.फड हे आजारी रजेवर आहेत. त्यामुळे डॉ.झोडपे या एकट्याच कार्यरत आहेत. नुकतीच डॉ.फड यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी दोन दिवसांपूर्वी डॉ.जाधव आले. परंतू त्या आगोदर डॉ.झोडपे यांनी यंत्रणा सांभाळली. कोरोना लसीकरण, ओपीडी आदी प्रतिबंधात्मक कारवाया कराव्या लागल्या. अशातही गावातील काही राजकीय लोकांनी आरोग्य केंद्रात येऊन वाद घालणे सुरू केले. महिला वैद्यकीय अधिकारी असतानाही त्यांना सहकार्य करण्याऐवजी तक्रारी केल्या. शनिवारी तर चक्क एका शिक्षकाने 'तुम्हीच इंजेक्शन द्या' असा हट्ट धरला. याच मुद्यावरून बाचाबाची झाली आणि डॉ.झोडपे व शिक्षक आणि त्यांच्या भावात वाद झाले. यावर संतापलेल्या डॉ.झोडपे यांनी अर्ज लिहित सोशल मिडीयावर अर्ज टाकत मी नोकरी सोडतेय असे कळविले. या प्रकाराने मात्र, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा - क्रीडा क्षेत्राची मोठी हानी; उदयाेन्मुख हाॅकीपटुचा कयाधु नदीपात्रात बुडून मृत्यू

ग्रामस्थांकडून सातत्याने त्रास मी दोन वर्षांपाूसन जातेगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मला लहान बाळ आहे. ते बाळ तुम्ही सोबतच का आणता, या मुद्यावरून अनेकदा वाद घातले. तसेच शनिवारीही एका शिक्षकाने तुम्हीच इंजेक्शन द्या असा हट्ट धरला. परिस्थितीवरून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भावाला बोलावून घेत आणखी वाद घातले. येथील ग्रामस्थांकडून सारखाच त्रास होत असल्याने मी नोकरी सोडत आहे. मी वरिष्ठांकडे आणखी राजिनामा दिला नाही पण संघटनेच्या ग्रुपवर अर्ज टाकला आहे.- डॉ.पल्लवी झोडपे, वैद्यकीय अधिकारी जातेगाव ता.गेवराई

हेही वाचा - धारूर घाटात कठडा तोडून टँकर दरीत कोसळला; चालक जागीच ठार

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीड