लोकांमध्ये अपमान केला; पतीने पत्नीचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:40 IST2019-05-16T23:40:07+5:302019-05-16T23:40:34+5:30

चार लोकांमध्ये अपमान केल्याने पत्नीला मारहाण करत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील लव्हुरी येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासुविरोधात केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Insulted people; Husband broke his wife's head | लोकांमध्ये अपमान केला; पतीने पत्नीचे डोके फोडले

लोकांमध्ये अपमान केला; पतीने पत्नीचे डोके फोडले

ठळक मुद्देपतीसह सासूविरोधात केज ठाण्यात गुन्हा

बीड : चार लोकांमध्ये अपमान केल्याने पत्नीला मारहाण करत डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील लव्हुरी येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासुविरोधात केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रेश्मा शेख असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. रेश्मा या आठवडी बाजारात साहित्य खरेदीसाठी गेल्या होत्या. यायला थोडा उशिर झाला. याचवेळी पती जहोरूद्दीन हुसेन शेख याने ‘बाजारहून उशिरा का आलीस आणि चार माणसांत माझा अपमान का केलास’ असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर दगड मारून तिचे डोकेही फोडले. ही घटना १४ मे रोजी लव्हुरी येथे घडली होती. उपचार घेतल्यानंतर रेश्मा यांनी केज ठाणे गाठून पती जहोरूद्दीन व सासू नजीरा शेख यांच्याविरोधात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोह ढाकणे हे करीत आहेत.

Web Title: Insulted people; Husband broke his wife's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.