कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:43+5:302021-03-13T05:00:43+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे, तसेच करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी ...

कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्या वाढवा
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे, तसेच करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच कोरोना चाचणीचे दिलेले उद्दिष्ट वेळेवर पूर्ण केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. याकामी सर्व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करा, अशा सूचना विभागीय उपायुक्त (विकास आस्थापना) सुरेश बेदमुथा यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक बेदमुथा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गीते, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, डॉ. बाबासाहेब ढाकणे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संजय कदम, तसेच जिल्ह्यातील तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाबाबत जिल्ह्यातील नागरिकात सतर्कता वाढण्यासाठी प्रशासनाने आखलेल्या उपायोजना तत्काळ राबविण्यात याव्यात. दुकानदार, व्यावसायिक, जनतेच्या जास्त संपर्कात असलेले सुपर स्प्रेडर यांना कोरोना तपासणी करून नंतर व्यवसाय-दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जावी. यासाठी कोरोना तपासणीची मोहीम राबवावी. मंगल कार्यालये, सभागृहे, चहा टपऱ्या, क्लासेस, गर्दी होणारी बस, वाहने, आदी ठिकाणी नियम भंग होत असेल, तर कारवाई केली जावी. याचबरोबर तालुकास्तरावरील यंत्रणेनेदेखील सक्षमपणे कार्यवाही करावी. तसेच लसीकरणाचीही गती वाढविण्याच्या सूचना बेदमुथा यांनी दिल्या. तसेच तालुकानिहाय कोरोना तपासण्यांची माहिती सादर करण्यात आली. भरारी पथक स्थापन करून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यास कारवाई करण्यात यावी, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
===Photopath===
120321\122_bed_26_12032021_14.jpeg
===Caption===
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत उपस्थित उपायुक्त सुरेश बेदमुथा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार.