राक्षसभुवन फाट्यावर अर्ध्यातासात दोन अपघातात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 20:08 IST2023-02-27T20:08:27+5:302023-02-27T20:08:49+5:30
कार आणि कंटेनर अपघातात तिघे जखमी झाले आहेत

राक्षसभुवन फाट्यावर अर्ध्यातासात दोन अपघातात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
गेवराई : राक्षसभुवनहून फाट्याजवळ आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान दोन अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले. उत्तरेश्वर चंद्रभान खरसाडे ( ३५, आहेर वडगांव तालुका जिल्हा बीड) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ सोलापुर- धुळे महामार्गावर राक्षसभुवन फाट्यावर एक कार ( क्रमांक एम.एच.१२ आय.जे ८९६१) चौफुली ओलांडून गेवराईकडे येत होती. याचवेळी गेवराईहून भरधाव आलेल्या कंटेनरने ( क्रमांक एच.आर ३८ ए.ई ९०५२ ) कारला समोरून जोराची धडक दिली. यात कार दुभाजकावर जाऊन पडली. तर कंटेनरने ही उलटून रस्त्यावर पडला. यात तिघे जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.
तर दुसरा अपघात याच रस्त्यावर अर्ध्या तासाच्या अंतराने झाला. गेवराईकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास ( एम.एच क्रमांक १४ जे ८७०६९ ) अज्ञात वाहनाने धडक दिली. यात उत्तरेश्वर चंद्रभान खरसाडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.