परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 07:18 PM2022-12-07T19:18:45+5:302022-12-07T19:19:31+5:30

माजीमंत्री आ. धनंजय मुंडे, प्रा. टी.पी. मुंडे आणि फुलचंद कराड यांनी केले वर्चस्व सिद्ध

In Parali veterans continue to dominate gram panchayats, unopposed election of members including sarpanch | परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड

परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड

googlenewsNext

परळी (बीड): परळी तालुक्यातील दिग्गज राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रभावातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. यात माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांचे पांगरा, प्रा. टी.पी. मुंडे यांचे मौजे मांडेखेल आणि माळहिवरा -गोपाळपूर, फुलचंद कराड यांचे लिंबोटा येथील ग्रामपंचायतिचा समावेश आहे. 

भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील लिंबोटा ग्रामपंचायत आत्तापर्यंत पाच वेळा बिनविरोध निवडली गेली आहे. यावेळी देखील सरपंचपदाच्या उमेदवार दैवशाला सुधाकर बनसोडे यांच्यासह सदस्य रवी गंगाधर कराड, सुरेखा सिद्धार्थ बनसोडे, अरुण वैजनाथराव मुंडे, छबीता जयराम मुंडे, स्वाती ऋषिकेश मुंडे, प्रकाश किसन राठोड व संगीता रमेश चव्हाण हे सर्व सात सदस्य बिनविरोध निवडले गेले. 

तसेच तालुक्यातील मांडेखेल ग्रामपंचायत बिनविरोध ताब्यात आली असून  सरपंचपदी प्रा.टी.पी.मुंडे यांच्या पत्नी शिवशल्या त्रिंबक मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच सदस्यपदी सुशिला घुगे, रामधन घुगे, आप्पाराव व्हावळे,  मधुकर नागरगोजे, प्रमिला नागरगोजे, विद्या व्हावळे,  दगडाबाई नागरगोजे, यमुनाबाई नागरगोजे आणि गजेंद्र राठोड यांची निवड झाली. तर माळहिवरा गोपाळपूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुक्षला आत्माराम कराड यांची बिननिवड झाली. तसेच विश्वंभर शिंदे ,आशाबाई फड, राजाभाऊ नवगरे, सुशीला डिघोळे, उषाबाई व्हावळे, मिराबाई नवगरे, रविराज व्हावळे सदस्यपदी निवड झाली. 

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे आणि वाल्मिक  कराड नेतृत्वाखाली तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले. येथे सरपंचपदी सुशील वाल्मीकराव कराड यांच्यासह 11 पैकी 10 सदस्य बिनविरोध निवडून आले. तर सचिन तिडके, अशाबाई पाचंगे, उषाबाई मुंडे, नितलताई गित्ते, ग्यानदेव मुंडे, मीनाताई कराड, कोमलताई घोडके, अनुसयाबाई राठोड, सुरेश चव्हाण, वाल्मिक पाचंगे हे १०  सदस्य बिनविरोध निवडून आले. येथे केवळ प्रभाग क्र.2 मधील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Web Title: In Parali veterans continue to dominate gram panchayats, unopposed election of members including sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.