बालेकिल्ल्यात काकाला पुतण्याचा धक्का; नवगन राजुरीत संदीप क्षीरसागरांच्या पॅनलला गुलाल

By सोमनाथ खताळ | Updated: December 20, 2022 11:53 IST2022-12-20T11:52:57+5:302022-12-20T11:53:47+5:30

नवगन राजुरी ग्रामपंचायतमध्ये विजय मिळवून बालेकिल्ला मजबूत ठेवण्याचे आव्हान दोन्ही क्षीरसागरांसमोर होते.

in Beed's Navgan Rajuri Sandeep Kshirsagar's panel wins | बालेकिल्ल्यात काकाला पुतण्याचा धक्का; नवगन राजुरीत संदीप क्षीरसागरांच्या पॅनलला गुलाल

बालेकिल्ल्यात काकाला पुतण्याचा धक्का; नवगन राजुरीत संदीप क्षीरसागरांच्या पॅनलला गुलाल

बीड :बीड तालुक्यातील नवगन राजुरी ग्रामपंचायतमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या आ.संदीप क्षीरसागर यांच्या गटात लढत झाली होती. यात आ.संदीप क्षीरसागर यांच्या गटाने बाजी मारत सरपंच पदासह १३ सदस्य निवडून आणले. सरपंचपदी मंजूषा बनकर या विजयी झाल्या. 

नवगन राजुरी ग्रामपंचायतमध्ये विजय मिळवून बालेकिल्ला मजबूत ठेवण्याचे आव्हान दोन्ही क्षीरसागरांसमोर होते. आ.संदीप क्षीरसागर व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वतीने डॉ.योगेश व डॉ.सारीका क्षीरसागर यांनी प्रचार रॅली काढली होती. तसेच अनेक ठिकाणी कॉर्नर बैठकाही घेतल्या होत्या. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. परंतू मंगळवारी निकाल जाहिर होताच आ.संदीप यांचा पूर्ण पॅनल निवडू आला. यावेळी राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: in Beed's Navgan Rajuri Sandeep Kshirsagar's panel wins