परळीत मटका अड्ड्यावर छापा; १८ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:36 IST2019-09-05T00:35:22+5:302019-09-05T00:36:04+5:30

येथील विविध मटका अड्ड्यावर छापा टाकत यावेळी १८ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४० मोबाईल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. बुकी मालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध परळी पोलीस घेत आहेत.

Impressions on Perlite Matka Base; Three people were captured | परळीत मटका अड्ड्यावर छापा; १८ जण ताब्यात

परळीत मटका अड्ड्यावर छापा; १८ जण ताब्यात

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : ४० मोबाईलसह २ दुचाकी जप्त; पाच प्रमुख मटका बुकी फरार

परळी : येथील विविध मटका अड्ड्यावर छापा टाकत यावेळी १८ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४० मोबाईल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. बुकी मालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध परळी पोलीस घेत आहेत.
तालुक्यातील भोपळा शिवारातील डोंगरावर बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून मटका बुकी उद्ध्वस्त केली. यावेळी १८ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ४० मोबाईल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तर पाच प्रमुख मटका बुक्की चालक फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. परळी तालुक्यात आतापार्यंत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोनि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. संतोष जोंधळे, जमादार भास्कर केंद्रे, मुंजा कुवारे, बालाजी दराडे, तुळशीराम जगताप, राहुल डोळस, विकास वाघमारे, अतुल हराळे यांनी केली.

Web Title: Impressions on Perlite Matka Base; Three people were captured