स्वच्छतेच्या मागणीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:38+5:302021-03-13T05:00:38+5:30
ठिकठिकाणी होतेय अवैध दारू विक्री गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू ...

स्वच्छतेच्या मागणीकडे दुर्लक्ष
ठिकठिकाणी होतेय अवैध दारू विक्री
गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने राजरोस विक्री असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
बसथांबा द्यावा
बीड : तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खजाना विहिरीजवळ बसथांबा करावा, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे. हे ठिकाण ऐतिहासिक असल्याने येथे परजिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी होते. वाहनांअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी बसथांब्याची मागणी आहे.
रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी व्हावे लागले आहे.
‘अन्नसुरक्षा’ला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थींना अन्नपुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. अशा तक्रारी करूनही याकडे लक्ष नाही. पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे
वाहतुकीस अडथळा
अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक व बसस्थानक परिसरात रस्त्यावरच प्रवासी वाहतुकीची वाहने व ऑटोरिक्षा यांचे पार्किंग केले जाते. अगोदरच हा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत वाढच होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.