शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण बीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येते आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ...

प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण

बीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येते आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारलेले हे निवारे शासकीय असतानाही त्याचा वापर अनेक ठिकाणी खासगी इमारतीसारखा होऊ लागला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मास्कची चढ्या भावाने विक्री

अंबाजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कच्या किमतीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.

बांधकाम साहित्याचा नागरिकांना त्रास

बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी, शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

‘नो पार्किंग’चा अंमल करावा

माजलगाव : येथील बसस्थानकासमोर वाहतूक पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’चा बोजवारा उडाला आहे. सर्रास या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने, विक्रेत्यांचे गाडे लावलेले असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन

नेकनूर : येथील बाजारतळावर काही दिवसांपूर्वी सावलीसाठी झाडे लावण्यात आली आहेत. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे झाडेदेखील जोमात आलेली आहेत, मात्र काही लोकांकडून ती झाडे तोडली जात आहेत. या झाडांपासून बाजारतळावर सावली तयार होईल, त्यामुळे झाडांचे संगोपन करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच झाड तोडणाऱ्यावर कारवाईचा इशारादेखील दिला आहे.