केजमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 16:19 IST2018-03-23T16:19:43+5:302018-03-23T16:19:43+5:30
पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील तांबवा (ता. केज) गावात गुरुवारी रात्री घडली.

केजमध्ये पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
बीड : पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील तांबवा (ता. केज) गावात गुरुवारी रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तंबावा येथे राहणारे सुंदर मुंडे हे शेती तर त्यांच्या पत्नी ललिता (वय ४६) या अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले असून मोठा मुलगा मुंबईत नोकरीस तर दुसरा मुलगा औरंगाबादला शिकत आहे. त्यामुळे ते दोघेच घरी राहत असत. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास त्यांने सुंदर याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: ही शेतातील झाडाला गळफास घेतला. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून खून व आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.