पत्नीला मारहाण करून पतीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:53 IST2019-05-27T00:52:57+5:302019-05-27T00:53:50+5:30
घरगुती कारणावरून पती-पत्नीत वाद झाले. याच वादातून पत्नीला मारहाण केली. तिला शेजारच्यांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करताच घरात असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

पत्नीला मारहाण करून पतीने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरगुती कारणावरून पती-पत्नीत वाद झाले. याच वादातून पत्नीला मारहाण केली. तिला शेजारच्यांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करताच घरात असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बीड शहरातील एकनाथ नगर भागात रविवारी सकाळी घडली.
अशोक बाबूराव मस्के (६५, रा. एकनाथनगर, बीड) असे मयताचे नाव आहे. एकनाथनगर भागात ते पत्नी किरण यांच्यासह रातात. त्यांची मुले शिक्षण व नौकरीसाठी बाहेरगावी असतात.
रविवारी सकाळी पती- पत्नीत घरगुती कारणावरुन वाद झाला. कडाक्याच्या भांडणानंतर अशोक मस्के यांनी पत्नीला मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. त्यानां शेजारच्यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
सर्व जण रूग्णालयात जाताच अशोक मस्के यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक यांचा मुलगा अतुल मस्के यांनी यांच्या खबरीवरून जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद झाली आहे.